MPSC clerk-typist टंकलेखन चाचणी

लिपिक-टंकलेखक पदे · महाराष्ट्र लोकसेवा आयोग

10 मिनिटेउत्तीर्ण होण्यासाठी: निव्वळ 30 wpmBackspace चालू, बाण कळा बंदमराठी

उरलेला वेळ
10:00
टाइप करायचा उतारा
लोकहितवादीने कोणाची मजुरी पत्करली नाही, कशाची अपेक्षा; आशा किंवा इच्छा धरली नाही. कोणाचे सांगण्यावरून किंवा शिकविल्यावरून कृत्रिम वर्णन केले नाही. लाभावर किंवा द्रव्यावर नजर ठेवून कीर्ती व्हावी या हेतूने लिहिले नाही. इतके श्रम जे केले ते लोकांस त्यांची वास्तविक स्थिती कशी आहे ती कळावी. त्यांनी सुधारावे, त्यास इहलोकी सुखवृद्धी व्हावी. परलोकाचे साधन घडावे, व आपले बहुत काळापासून दृढ ग्रह झाले आहेत यांपैकी काही अविचाराने व काही मूर्खपणाने जडलेले आहेत ते कमी व्हावे; किंवा नाहीसे व्हावे, इतक्याच हेतूने मी यथामतीने व स्वइच्छेने वेतनावाचून श्रम केले आहेत व जितके लिहिले आहे तितके अक्षरशः खरे खरे निवडून विचार करून काळजीने लिहिले आहे. हे सर्व लोकांस नजर आहे. हे लिखित शतक कोणी बाळबोध अथवा मोडी छापून मुलास लिखितासारखे वाचनास दिले तर बहुत नफा होईल. यास्तव या ग्रंथावर लोकहितवादी आपली सत्ता ठेवीत नाही. पाहिजे त्यांनी ही पत्रे छापून प्रगट करावी. किती एक प्राचीन काळचे लोकांस किती एक लोकहितवादीची मते विपरीत व हिंदुधर्मास विरुद्ध भासतील, परंतु हा त्यांचा मिथ्या भास आहे; कारण की, त्यात हिंदुधर्मास काही विपरीत नाही. फक्त मूर्खपणास मात्र विपरीत आहे. याविषयी विचार केला तर खात्री होईल. यापुढे काही दिवसांनी लोकहितवादी दुसऱ्या शतकास आरंभ करील; परंतु ही गोष्ट ईश्वराचे स्वाधीन आहे. मला वारंवार इतकेच लोकांस सुचवावयाचे की, मी काही व्यर्थ, मिथ्या किंवा असत्य, लिहिले नाही. जे लिहिले ते यथार्थ आहे, असे मला तर खचित वाटते. जे सारासार विचार करणारे, व ज्यांची मने पंडितांसारखी कुत्सित नसून विस्तीर्ण झाली आहेत त्यांस हे समजेल. माझी सर्व जनांस एवढीच विनंती आहे की, तुम्ही सर्व जण विचार करण्यास लागा, वाचावयास लागा, नवीन ग्रंथ व वर्तमानपत्रे वाचा व तुमचे शेजारी काय होत आहे याचा विचार करा. इंग्रजांमध्ये किती एक चांगले गुण आहेत व ते तुम्हांस प्राप्त व्हावे म्हणून ईश्वराने त्यांची तुमची संगत घातली आहे हे लक्षात आणा. सारासार पहा, परंपरा आंधळ्याची माळ लावली म्हणून तीच चालवू नका, धर्मशील ईश्वरतत्पर व्हा. या गुणांवाचून सर्व व्यर्थ आहे. सत्य बोला, दुष्ट वासना सोडा, धर्मसुधारणा करा, म्हणजे धर्म टाकू नका. परंतु त्याचा अर्थ घ्यावयाचा तसा काळ पाहून घ्या. व ईश्वरासंबंधी व जगासंबंधी ज्ञान सर्व लोकांस वृद्धिंगत करा. आळस सोडा, तुमच्यामध्ये वास्तविक बुद्धिमान असेल त्यांस पुढारी करा.

टाइप करण्यासाठी चौकटीवर क्लिक करा किंवा Enter दाबा. तुम्ही पहिली कळ दाबताच घड्याळ सुरू होते.

रोजचे ध्येय –

फोनवर चाचणी दिसते, पण परीक्षा कीबोर्डवर असते: कीबोर्डवरच सराव करा.

या चाचणीविषयी

वेळ
10 मिनिटे. परीक्षा केंद्रात आधी कीबोर्ड चाचणी, 10 मिनिटांची सराव चाचणी आणि छोटे विराम असतात.
उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक
मिनिटाला 30 निव्वळ शब्द. MPSC च्या स्वतःच्या सूचनापत्रकात वेग दिलेला नाही; हा इतर संकेतस्थळांवरून घेतला आहे. उतारा सुमारे 300 शब्दांचा आहे.
चुका
वगळलेला, जास्तीचा, दुसराच टाइप केलेला किंवा चुकीच्या स्पेलिंगचा प्रत्येक शब्द ही एक चूक, आणि चुकीचे कॅपिटल अक्षरही एक चूक. MPSC कोणतेही सूत्र प्रकाशित करत नाही, म्हणून इथे प्रत्येक चुकीसाठी एक शब्द वजा होतो, आणि कोणतीही चूक माफ केली जात नाही.
दुरुस्ती
Backspace चालते; बाण कळा, Home आणि End परीक्षेप्रमाणेच काहीही करत नाहीत.
कीबोर्ड
Unicode मधील मराठी: परीक्षेप्रमाणे Remington मराठी, किंवा Inscript, तुमच्या संगणकावर सेट करून.

स्रोत: MPSC, instructions for the Marathi and English typing skill test, May 2023, Mahabharti, MPSC clerk-typist exam details (the speeds). शेवटची तपासणी 24 ऑक्टोबर, 2026.

प्रकाशित नियमांनुसार सराव चाचणी. अधिकृत सॉफ्टवेअर नाही, आणि प्रमाणपत्रही नाही.

प्रश्न

निव्वळ वेग कसा काढला जातो?

टाइप केलेले शब्द, प्रत्येक चुकीसाठी एक वजा, भागिले मिनिटे. MPSC चूक कशाला म्हणायचे ते सांगते, पण सूत्र प्रकाशित करत नाही, म्हणून हा तिच्या सूचनांचा सर्वात सरळ अर्थ आहे.

बाण कळा काहीच का करत नाहीत?

MPSC ची टंकलेखन चाचणी बाण आणि नेव्हिगेशन कळा बंद ठेवते. Backspace चालते, म्हणून मागे राहिलेली चूक तिथपर्यंत खोडूनच दुरुस्त करता येते.

हे खरे MPSC सॉफ्टवेअर आहे का?

नाही. तुम्हाला सराव करता यावा म्हणून हे MPSC च्या प्रकाशित सूचनांचे पालन करते, पण हे परीक्षेचे सॉफ्टवेअर नाही.

lite-type

lite-type संगणकाच्या कीबोर्डवर टायपिंगचा सराव करण्यासाठी आहे, म्हणून ते मोठ्या स्क्रीनसाठी बनवले आहे, फोनसाठी नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून पुन्हा या.